Rahul Gandhi and Devendra Fadnavis 
देश

राष्ट्रवादी-भाजपची जवळीक वाढली? आता पवारांवरील काँग्रेसच्या टीकेला फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. शिवाय गौतम अदानी यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले होते की, अदानी यांचं उर्जा क्षेत्रातील योगदान मोठं आहे. यावरून काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र या टीकेला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक तर वाढत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अलका लांबा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, घाबरलेले, लोभी लोक आज आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. देशातील जनतेची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांपासून तसेच चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही ते एकटेच लढत आहेत.

अलका लांबा यांच्या या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं की, राजकारण होत राहील, पण काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या 35 वर्षांच्या दीर्घकाळ सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्याविषयी केलेले हे ट्विट भयावह आहे. राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत, असही फडणवीस यांनी म्हटलं.

एकंदरीतच देशात सध्या अदानींचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेसकडून सातत्याने २० हजार कोटी कोणाचे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर विरोधकांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत असून शरद पवार यांनी केलेलं विधान त्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT