subodhkumar and pradeep singh kharola sakal
देश

NEET Exam : ‘एनटीए’च्या महासंचालकांची उचलबांगडी; सुबोधकुमार यांच्यावर बडगा

‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज रात्री ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’चे (एनटीए) महासंचालक सुबोधकुमार यांची तडकाफडकी उचलबांगडी केली.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज रात्री ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’चे (एनटीए) महासंचालक सुबोधकुमार यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. ‘भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटने’चे अध्यक्ष आणि महासंचालक प्रदीपसिंह खारोला यांच्याकडे ‘एनटीए’चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

खारोला हे १९८५ च्या तुकडीचे कर्नाटक केडरचे अधिकारी आहेत. खारोला यांच्याकडे १ मे २०२४ रोजी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या (एसएससी) अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. दुसरीकडे केंद्र सरकारने ‘एनटीए’च्याच फेररचनेसाठी वेगाने पावले टाकायला सुरूवात केली असून विविध परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षांच्या आयोजनात पारदर्शकता आणण्यासाठी सात सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

केंद्राकडून सात सदस्यांची समिती स्थापन

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील अनियमितता रोखण्यासाठी तसेच तिच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा आज केली आहे.

‘इस्रो’चे माजी अध्यक्ष आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक के. राधाकृष्णन हे या समितीचे प्रमुख असतील. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल शिक्षण मंत्रालयाकडे सोपविणार आहे. ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या समितीच्या स्थापनेची घोषणा केली होती. ही समिती ‘एनटीए’ची रचना, कार्यपद्धती, परीक्षा प्रक्रिया आणि त्यातील पारदर्शकता तसेच डेटा सुरक्षेच्या अनुषंगाने सुधारणा करण्यासाठी शिफारसी करेल.

समितीची रचना

  • डॉ. के.राधाकृष्णन, ‘इस्रो’चे माजी प्रमुख (अध्यक्ष)

  • डॉ. रणदीप गुलेरिया, ‘एम्स’चे माजी संचालक (सदस्य)

  • प्रो. बी.जे.राव, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू (सदस्य)

  • प्रो. राममूर्ती, आयआयटी मद्रासचे निवृत्त प्राध्यापक (सदस्य)

  • पंकज बन्सल, ‘पीपल स्ट्राँग’चे सहसंस्थापक (सदस्य)

  • प्रो. आदित्य मित्तल, आयआयटी दिल्ली (सदस्य)

  • गोविंद जैस्वाल, सहसचिव शिक्षण मंत्रालय (सदस्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT