netaji subhas chandra bose
netaji subhas chandra bose sakal
देश

बेपत्ता होण्याच्या कारणांचा शोध घ्या...

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्याबाबतच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. त्यांचे बंधू शरतचंद्र बोस यांचे नातू आणि नातीने नव्याने चौकशीची मागणी केली आहे. जपानमधील रेंकाजी देवालयामधील अस्थी भारतात आणण्यालाही त्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र धाडण्यात आले आहे. शरतचंद्र यांचे थोरले पुत्र अशोकनाथ यांच्या मुली जयंती, तापती आणि मुलगा अजयकुमार यांनी हे पत्र पाठविले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर नेताजींचा ठावठिकाणा नेमकेपणाने लागलेला नाही. अलीकडेच एक छायाचित्र व्हायरल झाले.

त्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पार्थिवाच्या बाजूला नेताजी यांच्यासारखे दिसणारे एक संन्यासी बसल्याचे दिसून येते. हे छायाचित्र दिल्लीतील असल्याचा दावा करण्यात येत आहे. गुमनामी बाबा नावाचे हे संन्यासी प्रत्यक्षात नेताजी असून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये असा त्यांचा दावा आहे. या पत्रात संशोधक चंद्रचुड घोष आणि अनुज धर यांच्यासह प्रत्यक्षदर्शी तसेच न्यायवैद्यक अहवालांचाही दाखला देण्यात आला आहे. नेताजी बेपत्ता होण्याबाबत चौकशीसाठी मुखर्जी आयोगाची स्थापना करण्यात आली. न्यायमुर्ती मांजो मुखर्जी यांनी गुमनामी बाबा हे गुप्त वेशातील नेताजी असल्याची टिप्पणी केली होती. हा संदर्भही पत्रात देण्यात आला.

अस्थींबाबत मत बदलले

जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करल्यानंतर नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे मानले जाते. काही महिन्यांपूर्वी नेताजी यांचे इतर एक नातेवाईक चंद्रकुमार यांनी अस्थी भारतात आणण्याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. शरतचंद्र यांच्या नातवंडांनी मात्र त्यास विरोध दर्शविला आहे. वास्तविक चंद्रकुमार यांनीही अस्थी आणल्या जाऊ नयेत अशी भूमिका आधी घेतली होती, पण नंतर त्यांचे मत बदलले.

- श्यामल रॉय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT