JP Nadda
JP Nadda Sakal
देश

JP Nadda : २०२४ पर्यंत 'आता हरायचंच न्हाय!' भाजप पदाधिकाऱयांना संदेश

मंगेश वैशंपायन

यंदाच्या वर्षी ९ राज्यांत होणाऱया विधानसभा आणि २०२४ मधील लोकसभा यापैकी एकाही निवडणुकीत भाजपचा पराभव होता कामा नये.

नवी दिल्ली - यंदाच्या वर्षी ९ राज्यांत होणाऱया विधानसभा आणि २०२४ मधील लोकसभा यापैकी एकाही निवडणुकीत भाजपचा पराभव होता कामा नये. त्यासाठी कंबर कसून कामाला लागावे असा संदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज देशभरातील प्रमुख भाजप नेत्यांना दिला.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन आज दिल्लीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजपचे ३०० हून जास्त प्रतीनिधी दोशभरातून उपस्थित आहेत. आर्थिक, राजकीय व जागतिक पातळीवरील भारताचे महत्वाचे स्थान या ३ विषयांवरील ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.

पंतप्रधानांच्या भाषणानंतर उद्या (ता. १७) कार्यकारिणीचा समारोप होईल. आज उद्घाटनानंतर बैठकीला संबोधित करताना नड्डा यांनी, भाजपला यापुढे कोणताही पराभव स्वीकारार्ह नाही असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, आपल्याला यावर्षी व पुढच्या वर्षी होणारी एकही निवडणूक हरायची नाही. जिथे भाजपचे सरकार आहे तिथे संघटन अधिक मजबूत केले पाहिजे आणि सरकार नाही तेथे पक्षसंघटनेला आणखी ‘धार' दिली पाहिजे. असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या बूथ जिंका, या धोरणानुसार देशातील ७२ हजार बूथ भाजपसाठी असुरक्षित असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षआत आज तब्बल १ लाख ३० हजार बूथपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी आपली संपर्कसूत्रे प्रस्थापित केली आहेत.

नड्डा यांनी सांगितले की गुजरातच्या एतिहासिक विजयात पक्षसंघटना-कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. पण ‘स्वतः नेतृत्व करणे‘ हा वस्तुपाठ मोदींनी भाजप कार्यकर्त्यांसमोर ठेवला आहे. हिमाचल निवडणुकीत आम्हाला हिमाचलमधील ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा- प्रथा बदलायची होती. ती आम्ही बदलू शकलो नाही. मात्र यापूर्वी कोणताही पक्ष पाच टक्क्यांनी निवडणूक हरायचा, यावेळी ते प्रमाण केवळ एका टक्क्यावर आले आहे. भाजप व कॉंग्रेस यांच्यातील मतांचा फरक फक्त ३७ हजार इतका कमी आहे. या पराभवातून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचेही नड्डांनी सूचकपणे सांगितले.

नड्डा म्हणाले -

- जे सांगितले ते केले, हीच मोदी सरकारची ओळख बनली आहे.

- दयानंद सरस्वती यांच्या स्मरणार्थ पक्षातर्फे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

- समाजातील शेवटच्या रांगेतील व्यक्तीचीही काळजी आपण घेतली पाहिजे.

- गरीब कल्याण हा पक्षाचा एकमेव नारा आहे.

- तेलंगणात भाजपचेच सरकार येणार आहे.

- पंतप्रधानांनी १५ऑगस्टला लाल किल्ल्यावरून बोलताना पुढील ५ पण करण्याची शपथ देशवसीयांना देवविली होती. मानसिक गुलामगिरीतून स्वातंत्र्य, आपल्या परंपरेचा अभिमान, एकता आणि अखंडतेचे रक्षण, विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य व नागरी कर्तव्याची जाणीव. मोदींच्या या पाच प्रतिज्ञांची आज जगभरात चर्चा होते आहे.

- राजपथाचे कर्तव्यपथ असे नाकरण व इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसविणे या गुलामगिरीची निशआणी मिटविण्याचे उदाहरण.

- अमेरिकेपासून रशियापर्यंत जगात सर्वत्र आज भारताची आदराने दखल घेतली जात असून देशाचा जगात दबदबा वाढत आहे.

- रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधानांची जाहीर प्रशंसा केली आहे.

- भारतातील लोकांना बाहेर काढण्यासाठी रशिया-युक्रेनने काही तास युद्ध थांबवले.

- कोरोना महामारीत केवळ ९ महिन्यांत मेड इन इंडियाच्या दोन लसी तयार केल्या व आतापावेतो २२० कोटींहून जास्त लसीकरण झाले. हा जगातील विक्रम आहे.

- हर घर तिरंगा मोदीमेत ४ कोटी १५ लाख घरांवर तिरंगा फडकला.

- भारत जगातील ५ वी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. मोबाईल, आॅटोमोबाईल, स्टार्ट अप, डिजीटल व्यवहार, संरक्षण क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रात भारताने उत्पादन व निर्यात लक्षणीयरीत्या वाढवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT