pm modi Sakal
देश

PM मोदी जारी करणार नवी नाणी, 10,20 नाण्यांचं रुप बदलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काही नवी नाणी जारी करणार आहेत.

धनश्री ओतारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काही नवी नाणी जारी करणार आहेत. आज मोदींनी जारी केलेल्या नवीन नाण्यात एक, दोन, पाच, दहा शिवाय वीस रुपयांच्या नाण्याचा देखील समावेश आहे.

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आज म्हणजेच ६ जूनला सकाळी १०.३० वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभाचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान, पीएम मोदी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांच्या विशेष मालिकेचे प्रकाशन करतील. ही विशेष मालिका नाणी दृष्टिहीन व्यक्तींना सहज ओळखता येतील.

या नाण्यांवर AKAM लोगो असेल. मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, या लोगोमुळे दृष्टिहीन व्यक्तींना ही नाणी सहज ओळखता येऊ शकतात. विशेष म्हणजे, हा आठवडा 6 ते 11 जून 2022 या कालावधीत 'आझादी का अमृत महोत्सव' (AKAM) चा एक भाग म्हणून साजरा केला जात आहे.

नाण्यांच्या विशेष मालिकेव्यतिरिक्त, पंतप्रधान क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल - जन समर्थ पोर्टल, सरकारी क्रेडिट योजनांना जोडणारे एक-स्टॉप डिजिटल पोर्टल देखील लॉन्च करणार आहे. जन समर्थ पोर्टल हे अशा प्रकारचे पहिले व्यासपीठ आहे जे लाभार्थ्यांना थेट कर्जदारांशी जोडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT