Pegasus-Phone-Hacking Sakal
देश

न्यूयॉर्क टाईम्स म्हणजे 'सुपारी मीडिया'; पेगाससवर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

या प्रकरणावर राहुल गांधींनी मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : पेगासस (Pegasus) स्पायवेअर प्रकरणावर देशभरात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना केंद्रीय मंत्री व्ही के सिंह (Vk Singh Tweet On Pegasus) यांनी याबाबत मोठे विधान केले असून, सिंह यांनी न्यूयॉर्क टाइम्सला (Newyork Times) 'सुपारी माध्यम' म्हणून संबोधले आहे. तसेच त्यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सिंह यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "तुम्ही NYT वर विश्वास ठेवू शकता का? ते 'सुपारी मीडिया' म्हणून ओळखले जाते, असे ट्वीट केले आहे. दरम्यान, भारत आणि इस्रायल (Israel) यांच्यातील अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये पेगासस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी प्रामुख्याने होती, असा दावा 'न्यूयॉर्क टाईम्स' या अमेरिकन वृत्तपत्राने एका बातमीत केला आहे. यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारला धारेवर धरले असून, राहुल गांधींनी मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला आहे.

सरकारकडून आरोपांचे खंडन

गेल्या वर्षी या प्रकरणावर बराच वाद झाला तसेच विरोधी पक्षांनी (Opposition Party On Pegasus Issue) सरकारवर हेरगिरीचा आरोप करत संसदेत गोंधळ घातला. मात्र, सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. इस्रायली स्पायवेअर 'पेगासस'च्या माध्यमातून भारतीय नागरिकांची कथित हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.

हा तर देशद्रोह, पेगसस प्रकरणावर राहुल गांधींचा मोदींवर आरोप

राहुल गांधी यांनी ट्विट द्वारे मोदी सरकारवर हल्ला केला. "मोदी सरकारने हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली. यात राजकीय नेते, सामान्य नागरिक, लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था या सर्वांचीच हेरगिरी करण्यात आली. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका यांना लक्ष्य करण्यात आलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे" असा आरोप राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT