mehbooba mufti sister rubaiya Sayeed identifies terrorist yasin malik as her kidnapper  
देश

Yasin Malik: फुटिरतावादी यासिन मलिकच्या फाशीची मागणी; NIAची दिल्ली हायकोर्टात धाव

भारतीय जवानांवर गोळीबार, गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करण्याबरोबरच टेरर फंडिंगचेही त्याच्यावर आरोप आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी NIAनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. भारतीय जवानांवर गोळीबार, गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करण्याबरोबरच टेरर फंडिंगचेही त्याच्यावर आरोप आहेत. (NIA moves Delhi High Court seeking death sentence for Yasin Malik)

गेल्यावर्षी ट्रायल कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी एनआयएने ट्रायल कोर्टासमोर केली होती, पण ती फेटाळण्यात आली. आता एनआयएनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाचे न्या. सिद्धार्थ मृदुल आणि न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठासमोर सोमवारी एनआयएच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मे 2022 मध्ये, यासिन मलिकला दिल्लीच्या स्थानिक कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणात बेकायदेशीर प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरविण्यात आलं होतं. यासीननं आरोपांविरोधात खटला न लढवण्याचा निर्णय घेतला, त्याऐवजी त्यानं गुन्हा कबूल केला होता.

कोण आहे यासिन मलिक?

यासिन मलिक हा जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी नेता आणि पूर्वीचा दहशतवादी आहे. काश्मीरला भारत आणि पाकिस्तान दोन्हीपासून वेगळं करण्याची मागणी त्यानं सातत्यानं लावून धरली आहे. बंदी असलेल्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (JKLF) या काश्मीरस्थित संघटनेचा तो अध्यक्ष आहे. या संघटनेमार्फत टेरर फंडिंगसाठी पैसा पुरवल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT