nirf rankings 2022 iit madras best institution in india
nirf rankings 2022 iit madras best institution in india sakal
देश

आयआयटी मद्रास ठरली सर्वोत्कृष्ट संस्था

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’मध्ये (एनआयआरएफ) सलग चौथ्यांदा ‘आयआयटी मद्रास’ने बाजी मारली असून ती सर्वोत्तम संस्था ठरली. बंगळूरमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ला (आयआयएससी) सर्वोत्तम विद्यापीठ आणि संशोधन संस्थेचा मान मिळाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सातव्या ‘एनआयआरएफ रॅंकिंग’ची आज घोषणा केली. देशातील आघाडीच्या दहा संस्थांमध्ये सात आयआयटींचाही समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) या दोन संस्थांना या क्रमवारीमध्ये अनुक्रमे नववे आणि दहावे स्थान मिळाले आहे.

जामिया झळकले

विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये ‘आयआयएससी’ बंगळूरने पहिले स्थान मिळविले असून त्यानंतर जेएनयू आणि तिसऱ्यास्थानी जामिया मिलिया इस्लामिया या संस्थेचा क्रमांक लागतो. बनारस विश्व हिंदू विद्यापाठीच्या (बीएचयू) स्थानामध्ये मात्र यंदा घसरून होऊन ही संस्था सहाव्यास्थानी पोचली आहे. याच क्रमवारीमध्ये झळकलेल्या अन्य विद्यापीठांमध्ये जादवपूर विद्यापीठ, अमृत विश्व विद्यापीठम, मणिपाल ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, कोलकता विद्यापीठ, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद यांचा समावेश आहे.

‘आयआयटी’च जोरात

मद्रास, मुंबई, दिल्ली, कानपूर, खड्गपूर, रूरकी आणि गुवाहाटी मिरांडा महाविद्यालयाचा झेंडा महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये मिरांडा हाउस (दिल्ली) हे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरले असून हिंदू महाविद्यालयास (दिल्ली) दुसरे स्थान मिळाले आहे. याआधी हे महाविद्यालय नवव्यास्थानी होते. ‘लेडी श्रीराम कॉलेज फॉर वूमन दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानी गेले आहे तर चेन्नईमधील ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’ हे सातव्या स्थानावरून थेट तिसऱ्यास्थानी आले आहे. चेन्नईमधील लोयोला कॉलेज तिसऱ्यास्थानावरून चौथ्यास्थानी आले आहे. दिल्ली विद्यापीठाशी संबंधित सेंट स्टीफन्स आणि एसआरसीसी यांनी मागील वर्षी या यादीत स्थान मिळविले होते पण यंदा मात्र त्यांचा समावेश होऊ शकलेला नाही.

दर्जेदार संस्था

बी- स्कूल

आयआयएम अहमदाबाद, बंगळूर आणि कोलकता

औषधनिर्माण

जामिया हमदर्द (दिल्ली), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (हैदराबाद), पंजाब विद्यापीठ (चंडीगड)

वैद्यकीय शिक्षण

एम्स (दिल्ली), पीजीआयएमईआर (चंडीगड) आणि ख्रिस्तियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर

दंतवैद्यकीय

सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस चेन्नई,

मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT