Nitin Gadkari Says No Hindu King Ever Demolished A Masjid In 5000 Years Of History 
देश

'पाच हजार वर्षात एकाही हिंदू राजाने मशीद पाडली नाही' - गडकरी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाच हजार वर्षांच्या इतिहासात एकाही हिंदू राजाने एकही मशीद पाडली नसल्याचा दावा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तसेच, त्यांनी तलवारीच्या जोरावर कोणाचेही जबरदस्ती धर्मांतर हिंदू राजांनी केले नाही, असेही ते म्हणाले. दिल्लीतील अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही. जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीनं बोलत असल्याचे गडकरींनी सांगितले. आपली हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आयपीएल मॅच फिक्सिंग उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावर आता दिल्लीची जबाबदारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना कडक शिकवण दिली होती की, कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थानाचा अपमान होता कामा नये. कोणत्याही धर्माच्या माहिला असतील त्यांच्याशी आईसारखा व्यवहार करायला हवा. त्याचबरोबर सावरकरांनी जी राष्ट्रवादी विचारांची शिकवण दिली ती आपल्यासाठी खूपच गरजेची आहे. जर त्याकडे आपण आता लक्ष दिलं नाही तर एकदा आपण देशाला दोन तुकड्यात विभागलेलं पाहिलं आहे. जर हेच कायम राहिलं तर आपल्या देशातच नव्हे तर जगात समाजवाद, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता काहीही शिल्लक राहणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT