देश

बिहारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला स्थान नाही

वृत्तसंस्था

पटना: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (ता.02) आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याचा समावेश करण्यात आलेला नाही. जद(यू) आणि भाजपने लोकसभेची निवडणूक एकत्रित लढली होती.

या मंत्रिमंडळ विस्तारात जद(यू)च्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अशोक चौधरी, नीरज कुमार, लक्ष्मेश्वर राय, श्याम रजक, रामसेवक सिंह, बीमा भारती, संजय झा, नरेंद्र नारायण यादव या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.  

नव्या मंत्र्यांचा शपथग्रहण समारंभ राजभवनात झाला असून सकाळी 11.30ला या समारंभास सुरवात झाली. राज्यपाल लालजी टंडन यांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काल (ता.02) राज्यापालांशी मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावर चर्चा केली होती.

मोदी सरकार-2च्या मंत्रिमंडळात जद(यू)ला केवळ एका मंत्रीपदाच प्रस्ताव दिल्याने नाराज असलेल्या नीतीश कुमारांनी केंद्र सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनीही बिहारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT