Rakesh_Tiket 
देश

Farmers Protest: शनिवारी भारतभर 'चक्काजाम'; राजधानीला पडणार वेढा

सकाळ डिजिटल टीम

Farmers Protest: नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ६ फेब्रुवारी देशभरात चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे तीन राज्य वगळता देशभरात सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिली.

शनिवारी (ता.६) आम्ही दिल्लीमध्ये चक्का जाम आंदोलन करणार नाही, पण सर्व सीमाभागात आम्ही शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार आहोत. दिल्ली वगळता सर्व राज्यातील प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दर्शनपाल सिंह यांनी दिली. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार नाही, यावर  भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शिक्कामोर्तब केले. 

सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता आंदोलन संपेल. त्यानंतर एक मिनीटभर आपापल्या गाड्यांचे हॉर्न वाजवण्यात येतील. इंटरनेट सेवा बंद असल्याने खूप अडचणी येत आहेत, अशी माहिती टिकैत यांनी दिली. 

देशभरातील नागरिकांनी आपापल्या गावी, आपापल्या भागात चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही टिकैत यांनी केले. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नाकाबंदी कायम ठेवली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पाल सिंह संधू आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त करतार सिंह हे तिरंग्याचं महत्त्व सांगण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, यासाठी सिंघू बॉर्डरकडे रवाना झाले आहेत.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT