

multiple vehicle crash on Missing Link route
ESakal
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ पुलावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. बोरघाट परिसरातील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक मार्गावर फॉर्च्युनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा ताबा सुटला आणि तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या साखळी अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.