देश

‘हवामानानुसार विषाणूत बदल नाही’

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाची साथ एकाचवेळी अनेक देशांत सुरु झाल्याच्या चीनच्या दाव्याची पुष्टि करणारे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत, अशा शब्दांत भारताने आज हा दावा फेटाळून लावला. दरम्यान कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये हवामानानुसार बदल होण्याच्या शक्‍यतेचाही त्यांनी इन्कार केला. 

चीनमधील वुहान येथे कोरोनाचा पहिला उद्रेक झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. परंतु त्याच्याच बरोबरीने जगात इतरत्र किंवा अन्य देशातही ही साथ सुरु झाल्याची अधिकृत किंवा विश्‍वसनीय माहिती उपलब्ध नाही, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या ‘संडे संवाद’ या साप्ताहिक कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमात ते थेट जनतेशी संवाद साधतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनच्या दाव्यासंदर्भात माहिती व आकडेवारी गोळा करावी लागेल आणि ती पडताळून पाहिल्यानंतरच अधिकृत निवेदन करणे शक्‍य होईल. विषाणूचे स्वरुप हवामानाप्रमाणे बदलते आणि त्यामुळे नव्या हवामानातही तो नष्ट होत नाही व त्या हवामानाशी सुसंगत राहून त्याचा प्रसार व संसर्ग चालू राहतो; तसेच हा विषाणू नव्या हवामानात आणखी सशक्त होतो.  या त्याच्या बदलाच्या क्षमतेमुळे विशिष्ट भूभागातील हवामानाशी सुसंगत तयार केलेली लस इतरत्र लागू पडू शकत नाही, अशी एक शंका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. त्याचा त्यांनी इन्कार केला. या शंकेची पुष्टि करणारे पुरावे मिळालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचे म्युटेशन होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अन्य एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी केवळ शरीरात प्राणवायूची पातळी काहीशी कमी झाली हे कोरोनाचे लक्षण असू शकत नाही. इतरही अनेक घटक त्यास कारणीभूत होऊ शकतात.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT