Jitendra Awhad Mhada House Sakal Digital
देश

मुंबईत आमदारांना मोफत घर? आव्हाडांनी दिले उत्तर

आमदारांना म्हाडाच्या घरांसाठी ७० लाख रुपये मोजावे लागणार.

हलिमाबी कुरेशी

म्हाडाच्या घरांसाठी आमदारांना ७० लाख रुपये आकारण्यात येणार असल्याचं, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. मुंबईमध्ये सर्वपक्षीय आमदारांना घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केलीय. मात्र विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी या निर्णयावर टिका केली. आमदार पळून जाण्याची भिती असल्यानेच आमदारांना घर द्यावी लागत असल्याची टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलीय. तर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याविषयी नाराजी व्यक्त केलीय.

आमदारांना अनेक सोयीसुविधा असताना परत घरांचा लाभ कशासाठी असा सूर उमटताना दिसतोय. अनेक आमदार कोट्याधीश असून ते मुंबईत घर घेऊ शकतात.तसंच आमदार फार कमी काळ मुंबईत असतात,अशा प्रतिक्रिया उमटतायत.

आमदारांना ३०० घर देण्यात येणार या घोषणेनंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ उडालाय. यावर ट्विट करत आव्हाडांनी म्हटलं," मी यावर स्पष्टीकरण देउ इच्छितो की, म्हाडाच्या सदनिकांच्या जागांचा खर्च आणि बांधकाम खर्च अशी ७० लाख रुपयांची किंमत आमदारांना मोजावी लागणार आहे. ' आमदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून भाजपाचे १०५ आमदार कोट्याधीश असून, शिवसेनेचे ५१, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ४७ तर काॅंग्रेसचे ४२ आमदार कोट्याधीश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT