ITBP Yoga in Himalayan Ranges Sakal
देश

International Yoga Day 2022: १७ हजार फूट उंचीवर सीमा पोलिसांनी साजरा केला योगदिन

सीमा पोलिसांच्या हिमवीरांनी सिक्कीममधल्या १७ हजार फुटांवरच्या बर्फाळ प्रदेशात योगासने करत आजचा योगदिन साजरा केला.

सकाळ डिजिटल टीम

इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनी आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने हिमालयातल्या प्रचंड उंचीवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये योगासने केली आहेत. भारत चीन सीमेवर लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागात असलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांवर या जवानांनी योगासने केली. (Yoga performed by ITBP in himalayan ranges)

इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनी (Indo-Tibetian Border Police) लडाखमध्ये १७ हजार फूट उंचीवर आठव्या जागतिक योग दिनानिमित्त योगासने केली. अशाच पद्धतीच्या योगासनांचं सत्र हिमाचल प्रदेशामध्ये इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनीही भरवलं होतं. १६,५०० फूट उंचीवर या जवानांनी योगासने केली असून उत्तराखंडमध्येही १६ हजार फुटांवर जवानांनी योगासने केली.

तर या सीमा पोलिसांच्या हिमवीरांनी सिक्कीममधल्या १७ हजार फुटांवरच्या बर्फाळ प्रदेशात योगासने करत आजचा योगदिन साजरा केला. इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक गाणंही सादर केलं.

२०१५ सालापासून २१ जून रोजी जगभरात योगदिन साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी लोक योगा स्टुडिओ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी गोळा होतात, आणि योगासनं करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT