sayantan basu Sakal
देश

शोलेचा डायलॉग मारलेल्या भाजप नेत्याला नोटीस

सीतलकुचीमधील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते सायंतन बसू यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता - सीतलकुचीमधील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते सायंतन बसू यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी एकाला मारले तर आम्ही चार जणांचा बळी घेऊ असे म्हणताना त्यांनी शोलेतील डायलॉगचा संदर्भ दिला होता.

सीतलकुचीमध्ये प्रथमच मतदानास आलेला भाजप कार्यकर्ता आनंद बर्मन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडला. त्यानंतर दुपारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या गोळीबारात चार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. या पार्श्वभूमीवर बसू यांच्या वक्तव्याचा मजकूर नोटिशीला जोडण्यात आला.

बसू यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, मी, सायंतन बसू, तुम्हाला हे बजावण्यास आलो आहे की तुम्ही अकारण आव्हान देऊ नका. आम्ही सीतलकुचीचा खेळ खेळू. त्यांनी आधी सकाळी १८ वर्षांचा आनंद बर्मनला मारले. भाजपच्या शाखाप्रमुखांचा तो भाऊ होता. आम्हाला फार वाट पाहावी लागली नाही. त्यांच्यातील चार जणांना यमसदनास धाडण्यात आले. शोले चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही एक मारलात तर आम्ही चार मारू. सीतलकुची गाव याचे साक्षीदार बनले.

कारवाईचा इशारा

हे वक्तव्य आचारसंहिता, लोकप्रतिनिधित्व कायदा आणि भारतीय दंडसंहितेचा भंग करते असा ठपका आयोगाने ठेवला. हे वक्तव्य म्हणजे बंगाल आणि राज्यातील जनतेला खुली धमकी असल्याचे आयोगाने नोटिशीत नमूद केले आहे. खुलासा केला नाही तर आणखी संदर्भ न देता कारवाई केली जाईल, असेही बजावण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT