देश

गर्भवती आणि स्तनदा मातांच्या लसीकरणावरून सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गर्भवती आणि स्तनदा मातांच्या लसीकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून याबाबत मत मांडण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीतील बालहक्क संरक्षण आयोगाने याबाबतची याचिका न्यायालयात सादर केली होती. या याचिकेमध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांचा लसीकरणासाठी पात्र श्रेणीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. दिव्यांग मंडळींचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबतही येत्या दोन आठवड्यांमध्ये केंद्र सरकारने आपले म्हणणे सादर करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहे न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. बी.व्ही. नगरथना यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.

कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने यंदा जानेवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या सूचनांन्वयेच गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना लसीकरणासाठी पात्र व्यक्तीच्या श्रेणीतून वगळण्यात आले होते. या गटातील महिलांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे उघड झाल्यानंतर देखील या नियमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदल करण्यात आला नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. केंद्र सरकारची ही कृती या महिलांना राज्यघटनेच्या कलम १४, १५ आणि २१ अन्वये बहाल करण्यात आलेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. आता याप्रकरणाची दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT