देश

भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; रुग्णसंख्या पोहोचली...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 32,695 रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 9,68,876 वर पोहोचली आहे. सध्या देशात एकूण 3,31,146 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मागील 24 तासांत आणखी 20,572 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत 606 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9,68,876 वर पोहोचली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. राष्ट्रीय सरासरी प्रमाण 63.24 टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

कोरोना रुग्णांचा आकडा जाईल एक कोटीवर?

भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरूने (IISc) ने एक धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, एक नोव्हेंबरपर्यंत देशात एक कोटी नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. याशिवाय जानेवारी 2021 पर्यंत देशात या व्हायरसमुळे तब्बल 10 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रातही वाढते कोरोनाबाधित रुग्णांची संख्या

देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात 2.75 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्रात मार्चपासून आतापर्यंत 82 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड मध्ये स्पा सेंटरवर कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT