nupur sharma Muhammad protest offensive statement two arrested after Jumma prayers outside Jama Masjid
nupur sharma Muhammad protest offensive statement two arrested after Jumma prayers outside Jama Masjid sakal
देश

जामा मशिदीबाहेर जमावाच्या भावना भडकावल्याबद्दल दोघांना अटक

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - पैगंबर महंमद यांच्या विरूध्द भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या निषेधार्थ जामा मशिदीच्या बाहेर शुक्रवारी (ता.१०) जुम्मा नमाजानंतर झालेल्या तीव्र निदर्शनांमागे जमावाच्या भावना भडकावल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी आज दोघांना अटक केली. जामा मशिदीच्याच परिसरतील मोहम्मद नदीम (वय ४३) व तुर्कमान गेट भागात राहणारा फहीम (३७) अशी त्यांची नावे आहेत. जामा मशिदी बाहेर शुक्रवारच्या नमाजानंतर प्रचंड संख्येने जमलेल्या जमावाने नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांना अटक करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली होती.

त्यानंतर काही वेळातच निदर्शनांचा वणवा नवी मुंबई, सोलापूर व अहमदनगरसह देशाच्या अनेक शहरांत पसरला. पश्चिम बंगाल व झारखंडची राजधानी रांची सह सहारणपूर व अन्य शहरांत या निदर्शनांना हिंसक वळण लागले. त्याच्या अगोदर एक दिवस सोशल मिडीयावर एक व्हायरल मेसेज फिरला होता. त्यामुळे निदर्शनांबाबत फतवा निघाल्याची भावना मुसलमान समाजात देशभर पसरली असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्लीतील निदर्शनांशी जामा मशिदीचा किंवा आपला काही संबंध नाही असे सांगून शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी या प्रकाराशी आपला संबंध झटकला होता. दिल्लीत निदर्शनांनंतर काही मिनिटांत जामा मशिदीच्या परिसरात मोठे पोलिस बळ तैनात करण्यात आले होते त्यामुळे दिल्लीतील अनावस्था प्रसंग टाळला गेला. मात्र आता दर शुक्रवारी नमाजानंतर या निदर्शनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी आज दोघांना केलेली अटक हा त्याचा पहिला भाग मानला जातो.

नदीम व फहीम यांना जमावाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त श्वेता चोहान यांनी सांगितले की भारतीय दंडविधान कलम १८८ (लोकसेवक आदेशाचे उल्लंघन) कायद्याखाली जामा मशीद पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आज या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जामा मशिदीच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेजही पोलिस तपासत असून या निदर्शनांचे ज्यांनी मोबाईल चित्रण केले त्यापैकी अनेक फुटेजही पोलिस तपासत आहेत. या दोघांनी निदर्शनांना चिथावणी दिल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार सईद अंसारी यांनी सांगितले की इमाम बुखारी यांनी शुक्रवारी जामा मसिदीच्या पायऱयांवरील जमावाकडून घोषणाबाजी व निदर्शने सुरू असतानाच आपल्याशी बोलताना, ‘या निदर्शनांत कोण सहभागी झाले होते त्याबाबत आपल्याशी बोलताना कानावर हात ठेवले होते व अशा लोकांविरूध्द कारवाई करावी अशीही मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT