Nupur Sharma Latest news Nupur Sharma Latest news
देश

नूपुर शर्माला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम दिलासा; सक्तीची कारवाई न करण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नूपुर शर्माला (Nupur Sharma) मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने तिच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणीही याच दिवशी निश्चित केली आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत जिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. (Nupur Sharma Latest news)

नोटीसमध्ये न्यायालयाने (Supreme Court) राज्ये आणि केंद्र सरकारला विचारले आहे की, नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर दाखल झालेले गुन्हे एका ठिकाणी हस्तांतरित का केले जाऊ नयेत. राज्ये आणि केंद्राच्या उत्तरानंतर न्यायालयाकडून खटल्यांच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही आमच्या पूर्वीच्या आदेशात थोडी सुधारणा करतो. तुम्ही प्रत्येक कोर्टात जावे असे आम्हाला वाटत नाही. नूपुर शर्माने दाखल केलेल्या याचिकेत वेगवेगळ्या ठिकाणी ९ एफआयआर नोंदवले असून, या सर्वांची एकाच ठिकाणी बदली करावी. जेणेकरून देशातील विविध शहरात जावे लागू नये, असे म्हटले होते.

नूपुर शर्माचे (Nupur Sharma) वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, नूपुर शर्माच्या जिवाला धोका आहे. तिला धमक्या येत आहे. यावर न्यायालयाने सांगितले की, आम्हाला तुमचे कायदेशीर पर्याय कायम ठेवायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT