monkey esakal
देश

''एक हाथ से दो, एक हाथ से लो''; पाहा, चतुर माकडाचा भलताच स्मार्टपणा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाऴ वृत्तसेवा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

काही जण खूपच करामती असतात. अशा करामती लोकांमुळे बहुतेकदा मजा येते, तर कधी कधी डोक्याला तापही होतो. प्राणीही काही कमी करामती नसतात. काही प्राण्यांच्या करामती पाहिल्या की, आपल्याला हसू आवरता येत नाही आणि तो प्राणी जर आपला पूर्वज माकड असला तर मग विषयच खोल बनून जातो. आपले पूर्वजही आपल्यासारखेच करामती असणार ना..? मुळात माणसातला हा करामतीपणा हा पूर्वज माकडांचीच देण तर नाही ना..?

माकडाच्या अशाच एका करामतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात हे माकड महाशय एका व्यक्तीचा चष्मा आणि रुमाल घेऊन पळून जातो आणि एका उंच पिजऱ्यावर जाऊन ऐटीत बसतो. पण चष्म्याचं नुकसान करत नाही. कारण हे माकड महाशय तत्वनिष्ठ आहे. त्यांना हा चष्मा परत करायचा होता. पण त्यांची एक स्टाईल आहे. एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हातानं द्यायचं, म्हणूनच हा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी व्हिडीओला कॅप्शन दिलंय “स्मार्ट, एक हाथ दो, एक हाथ लो.’

व्हिडीओच्या सुरुवातीला दोन माकडं एका मोठ्या पिंजऱ्यावर बसलेली दिसत आहेत. यातील एक माकडाच्या हातात एक चष्मा आणि रुमाल दिसत आहे. तेथील एका व्यक्तीकडून त्यानं या वस्तू पळवल्या आहेत. या गोष्टी मिळवण्यासाठी व्यक्तीने प्रयत्न केले. पण माकडाने काय त्या माघारी दिल्या नाहीत. माकडाला त्या वस्तू खरंतर परत द्यायच्या होत्या. मात्र त्याबदल्यात त्याला ज्यूस हवा असतो. मग ही व्यक्ती माकडाची इच्छा पूर्ण करायचं ठरवतो. हात उंच करून तो या माकडाच्या हातात ज्यूसचा बॉक्स देतो. जसा त्या माकडाच्या हातात बॉक्स मिळतो तसं ते सज्जन माकड लगेच त्याच्या हातातला बॉक्स परत देतं. ट्विटरवर हा विनोदी व्हिडीओ क्लिप 25 हजार लोकांनी पाहिला. लोकांनी त्यावर अनेक मनोरंजक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT