ola ceo bhavish aggarwal on ola and uber are considering potential merger
ola ceo bhavish aggarwal on ola and uber are considering potential merger  
देश

Ola and Uber Merger : ओला-उबेर विलीनीकरण होणार? भाविश आग्रवाल म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

Ola-Uber Merger : देशातील प्रसिध्द कॅब सर्व्हिस कंपनी Ola आणि Uber Technologies Inc यांच्या विलीनकरणासंबंधी बातम्या समोर येत आहेत, मात्र ही केवळ अफवा असून घातल्याचे समोर आले आहे.काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी विलीनीकरणासंदर्भात सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे उबेरच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, आता ओलाचे भाविश अग्रवाल यांनी याला 'बकवास' असल्याचे म्हटले आहे.

ओलाचे कार्यकारी अधिकारी भाविश आग्रवाल यांनी ट्वीट करत या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर विलीनीकरणाशी संबंधित बातम्या शेअर करताना त्याने लिहिले की, पूर्णपणे बकवास.आम्ही खूप नफ्यात आहोत आणि चांगले वाढ नोंदवत आहोत. इतर काही कंपन्या भारतातून त्यांचा व्यवसाय सोडू इच्छित असल्यास त्यांचे स्वागत आहे! आम्ही कधीही विलीन होणार नाही. महत्वाचे म्हणजे ओला आणि उबेर या दोन कंपन्या भारतात सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

गेल्या महिन्यात, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की Uber Technologies भारतातून आपला व्यवसाय बंद करत आहे. मात्र, उबर इंडियाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. भारतातून व्यवसाय बंद करण्याचा विचारही करू शकत नाही, असे उबेरकडून सांगण्यात आले. उबरच्या दृष्टीने भारत आणि जपान ही आशियातील सर्वाधिक वाढणारी बाजारपेठ आहे.

सॅन फ्रान्सिस्को-बेस्ड कंपनी Uber ने 2013 मध्ये भारतात सेवा सुरू केली आणि आता ती देशभरातील जवळपास 100 शहरांमध्ये कॅब उपलब्ध करून देत आहे. त्याच वेळी, ओलाबद्दल बोलताना, भारतात व्यवसाय विस्तारत आहे. ओला आपल्या इनिशिअल पब्लिक ऑफरींग (IPO) ची तयारी करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयपीओ येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT