Olive-Ridley-turtle 
देश

‘ऑलिव्ह रिडले’ची धाव बंगालच्या उपसागराकडे

स्मृती सागरिका कानुनगो -सकाळ न्यूज नेटवर्क

भुवनेश्‍वर -  ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध असलेल्या ओडिशातील केंद्रपाडा या जिल्ह्यातील गहिरमाथा आणि ऋषिकुल्य दरम्यान गेल्या महिनाभरात चार कोटींपेक्षा जास्त कासवांच्या पिल्लांनी अंड्यांमधून बाहेर पडून समुद्राकडे धाव घेतली. या वर्षीच्या ‘ऑलिव्ह रिडले’चा प्रजनन हंगामाची सांगता झाली असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

गहिरमाथा येथील ‘नासी - २’ बेट आणि ऋषिकुल्य दरम्‍यानच्या किनारी भागात मे महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांनी घातलेल्या अंड्यांतून दोन कोटी पिले बाहेर पडली असल्याचे राज्याच्या वन्यजीव व वन विभागाने सांगितले. ऋषिकुल्य खोऱ्यातील गोखरकुडा किनाऱ्यावरही दोन कोटींपेक्षा जास्त पिले बाहेर पडली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राजनगर खारफुटी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी विकास रंजन दास म्हणाले की, किनाऱ्याची धूप, पाऊस अशा बाबी लक्षात घेता  ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांनी घातलेली अंडी उबण्याचे प्रमाण यंदा ७० टक्के होते. तसेच यंदा कोणताही अडथळा नसल्याने पिले सहजपणे बंगालच्या उपसागरापर्यंत पोचू शकली.

‘ऑलिव्ह रिडले’च्या अंड्यांचे प्राणी व माणसापासून रक्षण करण्यासाठी वनविभागाने ऋषिकुल्य किनाऱ्यावर पाच किलोमीटरपर्यंत धातूच्या तारेचे कुंपण घातलेले आहे.
- विकास रंजन दास,  विभागीय वन अधिकारी, राजनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT