Omicron variant sakal media
देश

जाणून घ्या: दिल्लीत सापडलेल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाची लक्षणे

दिलासादायक: दोन डोस पूर्ण केलेल्या रूग्णासाठी

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्राॅन संसर्गाचे (Omicron Variant)जगभरात रूग्ण वाढत असतानाच भारतात देखील ओमिक्रॉनचे आतापर्यंत पाच रुग्ण सापडले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीत (Karnataka,Maharashtra,Delhi) हे रूग्ण सापडले आहेत. प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून, घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापैकी राजधानी दिल्लीत सापडलेला रूग्ण हा आफ्रिकन देशातील टांझानियामधून आलेला होता. त्याच्यावर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णास सुरवातीला ताप होता. याशिवाय त्याचा घसाही दुखत होता. अशी माहिती एलएनजेपीचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार (D.Suresh Kumar) यांनी दिली. नेमकी कोणती लक्षणे होती जाणून घेऊया.

ओमिक्रॉन टाळण्यासाठी लसीचे दोन्ही डोस देणे आवश्यक आहे. डोस पुर्ण असणाऱ्या व्यक्तीमध्ये ओमिक्रॉन असेल तर त्याला 'आयसीयू' ची गरज भासत नाही.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. या रुग्णाचा पहिल्यांदा घसा दुखू लागला. त्यानंतर त्याला थकवा जाणवू लागला. मात्र त्याची ऑक्सिजन पातळी कमी झालेली नसून त्याची तब्येत उत्तम आहे. ओमिक्रॉन टाळण्यासाठी लसीचे दोन्ही डोस देणे आवश्यक आहे. डोस पुर्ण असणाऱ्या व्यक्तीमध्ये ओमिक्रॉन असेल तर त्याला 'आयसीयू' ची गरज भासत नाही.

डॉ. सुरेश कुमार म्हणाले की, डॉक्टरांची टीम २४ तास रुग्णावर लक्ष ठेवून आहे. ऑक्सिजनच्या पातळीची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. रूग्णाच्या शरीरातील होणाऱ्या बदलाकडे डॉक्टरांचे बारीक लक्ष आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालय सज्ज

रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढल्यास या आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. जीनोम सिक्वेंसिंग रिपोर्ट येण्यास वेळ लागतो. यासाठी ४ ते ५ दिवस लागतात. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास हि सांगणयात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT