omicron esakal
देश

Omicron | केंद्राची नवी नियमावली, प्रवाशांवर घातली बंधने

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाचा (coronavirus) नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अशातच डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकार सतर्कता बाळगत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून (health ministery) नवी नियमावली (new guidelines) तयार करण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट

दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके(South Africa)वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले होते. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. मात्र वाढत्या लसीकरणामुळे रुग्णांची संख्या घटली होती. मात्र आता अमेरिका, युरोपमधील काही देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, चीन, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझिलंड, झिंबाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर आणि इस्राईलमध्ये हा कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या देशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

शासनाची नवी नियमावली...

ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या 12 देशातून भारतात परतणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार संबंधित देशातून भारतामध्ये आलेल्या प्रवाशाला त्यांने मागील 14 दिवसांत कुठेकुठे प्रवास केला, त्याचा तपशील सादर करावा लागणार आहे. सोबतच त्याला कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर सबमीट करणे बंधनकारक आहे. तरच संबंधित प्रवाशाला देशात प्रवेश मिळणार आहे. येत्या एक डिसेंबरपासून नवी नियमावली लागू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT