On Bihar CM Nitish Kumar statement Chairperson of the National Commission for Women NCW says behalf of every woman in this country demand an immediate and unequivocal apology knp94
On Bihar CM Nitish Kumar statement Chairperson of the National Commission for Women NCW says behalf of every woman in this country demand an immediate and unequivocal apology knp94 
देश

VIDEO: नितीश कुमारांचं लोकसंख्या नियंत्रणाबाबत ते वक्तव्य; महिला आयोग आक्रमक, भाजप म्हणालं,'अश्लील नेता'

कार्तिक पुजारी

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेमध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर बोलताना कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपने यावरुन नितीश कुमारांवर टीका करत हा अश्लील प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याप्रकरणाची दखल घेतली असून नितीश कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

नितीश कुमार विधानसभेमध्ये प्रजनन दर आणि महिलांचा त्यामधील सहभाग याबाबत बोलत होते. ते म्हणाले की, पूर्वी राज्याचा प्रजनन दर ४.३ होता पण तो आता कमी होऊन २.९ झाला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात महिला अशिक्षित असल्याने पतीला संबंध ठेवताना विरोध करायच्या नाहीत. पण, आता महिला शिक्षित झाल्या आहेत, त्या पतीसोबत संबंध ठेवतात पण मुल होऊ नये यासाठी काळजी घेतात, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. बोलताना त्यांनी कथित आक्षेपार्ह हातवारे करत समजावून सांगितलं होतं.

भाजप आक्रमक

नितीश कुमारांच्या या प्रकारानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भारतीय राजकारणात नितीश कुमारांसारखा अश्लील नेता झाला नसेल. नितीश कुमार यांच्या डोक्यामध्ये एडल्ट बी ग्रेड चित्रपटाचा किडा घुसला आहे. सार्वजनिक रित्या त्यांच्या द्विअर्थी वक्तव्यांवर बंदी आणली जावी. त्यांच्यावर संगतीचा परिणाम पडला आहे, असं म्हणत भाजपने टीका केली. (On Bihar CM Nitish Kumar statement Chairperson of the National Commission for Women NCW says behalf of every woman in this country demand an immediate and unequivocal apology)

राष्ट्रीय महिला आयोग काय म्हणाले?

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणाल्या, एनसीडब्लू सर्व महिलांच्या वतीने मागणी करते की त्यांनी तात्काळ माफी मागावी. महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे नितीश कुमारांचे वक्तव्य होते. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे वक्तव्य आपल्या समाजावरील काळा डाग आहे.एक नेता अशाप्रकारचे वक्तव्य करत असेल तर राज्य त्यांच्या नेतृत्वात कशाप्रकारे काम करत असेल? आम्ही त्यांच्या वक्तव्याविरोधात ठामपणे उभे आहोत.

नितीश कुमार यांनी जेव्हा विधानसभेत हे वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्या मागे बसलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतर नेते हसत होते. तेजस्वी यादव म्हणाले की, ते काहीही आक्षेपार्ह बोलले नाही. ते लैंगिक शिक्षणाबाबत बोलत होते. बायोलॉजीच्या पुस्तकात तुम्हाला हेच शिकवलं जातं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT