Communist Party
Communist Party  esakal
देश

Communist Party : सीकरमध्ये माकपला संधी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजस्थानमधील सीकर मतदारसंघात यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात दिसणार नाही. ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपावेळी ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वाट्याला गेली आहे. अर्थात ‘माकप’ला काँग्रेससह आघाडीतील इतर पक्षांचा पाठिंबा असल्याने भाजपसाठी ही निवडणूक तितकी सोपी ठरणार नाही. १९५१ पासून आतापर्यंत झालेल्या १७ निवडणुकांत काँग्रेसने येथे सात वेळा बाजी मारली आहे. दुसरीकडे भाजपने पाचवेळा येथून विजय मिळवला आहे. माकपने या मतदारसंघात १९६७ पासून नऊ वेळा नशीब आजमावले असले तरी त्यांना येथे खाते उघडता आलेले नाही.

सीकरची जागा न मिळाल्याचे दुःख काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे, मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी माकपला मदत करण्याचीही त्यांची तयारी दिसून येत आहे. आतापर्यंत सातवेळा लोकसभा निवडणूक लढविलेल्या अमरा राम यांना ‘माकप’ने उमेदवारी दिली होती. त्यांचा मुकाबला भाजपचे विद्यमान खासदार सुमेधानंद सरस्वती यांच्याशी होईल. सीकरच्या बदल्यात माकपने काँग्रेसला झुंझनू, चुरू आणि बिकानेर मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये माकपची फारशी ताकद नाही.

विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यापैकी एकही जागा त्यांना जिंकता आलेली नाही. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी) आणि बहुजन समाज पक्षापेक्षाही (बसप) माकपच्या मतांची टक्केवारी कमी होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचाच विचार केला तर सुमेधानंद सरस्वती यांना ५८ टक्के मते मिळाली होती, तर अमरा राम यांना अवघी २.३७ टक्के मते मिळाली होती. सीकर मतदारसंघ राज्यातील शेखावटी भागात मोडतो. जाट समाजाचे याठिकाणी प्राबल्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT