Osho Ashram  Team eSakal
देश

ओशोंच्या आश्रमात घोटाळा? अनुयायांनी घेतली रामदास आठवलेंची भेट

अनुयायांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.

सुधीर काकडे

पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमाच्या भुखंड घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप ओशोच्या अनुयायांनी केला आहे. या घोटाळ्यात ओशो आश्रमाचे संचालकंचा समावेश असल्याचे देखील तक्रारदारांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी ओशोच्या अनुयायांनी यापुर्वी देखील केली होती. याच प्रकरणात आता अनुयायांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.

ओशो आश्रमात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून अनुयायांनी अनेक वेळा या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. याच प्रकरणात आता केंद्र सरकारने लक्ष घालावे ही मागणी घेऊन ओशो अनुयायांनी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्ण शुक्ला यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी ओशो फाउंडेशनचे व्यवस्थापकिय विश्वस्त योगेश ठक्कर उपस्थित होते. यावेळी ओशो आश्रमात सुरु असलेले गैरव्यवहार आणि आर्थिक व्यवहाराकडे लक्ष घालावे अशी मागणी केली. ओशो आश्रम केंद्र सरकारला मिळणारा मोठा महसूल ओशो आश्रम बुडवला जात असल्याता देखील आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोगाव पार्कची ओशो आश्रमात जवळपास २० एक्कर जमीन आहे. ही जमीण परस्पर विकली जात असून, त्याचा पैसा परदेशात पाठवला जात असल्याचा आरोप अनुयायांकडून करण्यात आलेला आहे. तसेच पुण्यातील आश्रम परिसरात असणारी बुद्धांची मुर्ती सुद्धा संचालकांनी हालवली असून, परत बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी अनुयायांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.

ओशो आश्रमाची प्रशासकीय संस्था ही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आहे. या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टतंर्गत आहे. या संस्थेत कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी परकील चलन प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे. या व्यवहाराची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास त्यातून किमान एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार पुढे येऊ शकेल, असे फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश ठक्कर यांनी यापुर्वीही नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT