padmnabhswami temple 
देश

ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

तिरुअनंतपुरम- सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे प्रशासन त्रावणकोरच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा 31 जानेवारी 2011 चा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयाने पद्मनाभस्वामी मंदिराचे नियंत्रण राज्य सरकारकडे सोपवले होते. मात्र, हे नियंत्रण पुन्हा राजघराण्याकडे आले आहे.

स्वयंसेवकांमुळे धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असेल, तर नागपूरला स्वयंसेवक...
न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. एक अंतरिम पाऊल म्हणून, मंदिराचे कामकाज संभाळणारी समिती तिरुअनंतपुरमच्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. राज्य सरकारला या मंदिराचे नियंत्रण देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यात त्रावणकोरच्या राजघराण्याण्याचीही एक याचिका होती. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्रावणकोर राजघराण्याने आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण भारतातून अनेक भाविक पद्मनाभस्वामीच्या दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर केरळची राजधानी तिरुअनंतपुरमच्या अगदी मधोमध वसलेले आहे. अनेक भाविक मंदिराला पाहून रडायलाही लागतात. केरळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत, असं मंत्री कदामपल्ली सुरेंद्रन म्हणाले आहेत.

"राहुल गांधींना सचिन पायलट आणि सिंधिया यांचा मत्सर वाटतो" 
पद्मनाभस्वामी मंदिराने पुनर्निमाण 18 व्या शतकात त्रावणकोर राजघराण्याने केले होते. त्रावणकोर राजघराणे 1947 पूर्वी दक्षिण केरळ आणि तामीळनाडूतील काही भागावर राज्य करत होते. पद्मनाभस्वामी भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर असल्याचं मानलं जातं. काही वर्षांपूर्वी या मंदिराचे जेव्हा काही गुप्त दरवाजे उघडण्यात आले तेव्हा यातून 1 लाख कोटींपेक्षा अधिक संपत्ती सापडली होती. त्यामुळे हे मंदिर चांगलेच चर्चेत आले. विशेष म्हणजे या मंदिरातील काही गुप्त दरवाजे उघडणे बाकी आहे. 2016 मध्ये मंदिरातून 186 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी झाली होती.

6 व्या शतकामध्ये या मंदिराचे निर्माण करण्यात आल्याचे सांगितले जाते. 1750 मध्ये त्रावणकोरचा शूर राजा मार्तंड वर्मा याने आजूबाजूचा प्रदेश जिंकून संपत्ती वाढवली होती. हे मंदिर त्रावणकोर राजांनी देवाच्या नावावर करत, देवालाच राजा म्हणून घोषीत केले होते. मंदिरात भगवान विष्णुची मूर्ती सापडली आहे, शालिग्राम दगडापासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT