light sakal
देश

पाकिस्तानातून आलेले निर्वासित राहताहेत वीजेविना

न्यायालयात याचिका; केंद्र, राज्याकडून उत्तर मागितले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सुमारे ८०० हिंदू नागरिकांनी वीज कनेक्शनबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि टाटा पॉवरकडे उत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन.पटेल आणि न्यायाधीश अमित बन्सल यांच्या पीठाने गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, दिल्ली सरकार, उत्तर दिल्ली महानगरपालिका, दिल्ली वीज नियामक आयोग, टाटा पॉवर दिल्ली वितरण लिमिटेड आणि उत्तर दिल्लीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून याचिकेवर उत्तर मागितले आहे.

येत्या २२ ऑक्टोबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकेत २०० हिंदू निर्वासित कुटुंबांसाठी वीज जोडणीची मागणी करण्यात आली असून त्यात सुमारे ८०० नागरिकांचा समावेश आहे. निर्वासित नागरिक सध्या उत्तर दिल्लीच्या आदर्श नगर भागात दिल्ली जल बोर्डाच्या मैदानात राहत आहेत. याचिकाकर्ते हरिओम म्हणाले की, याचिकेत सामील असलेल्या कुटुंबात सर्वाधिक संख्या पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांची आहे. ही मंडळी सिंध प्रांतातील असून ते गेल्या काही वर्षांपासून विजेविना राहत आहेत.

अडचणींचा डोंगर

ॲड. समीक्षा मित्तल, आकाश वाजपेयी आणि आयुष सक्सेना यांच्या वतीने दाखल याचिकेत म्हटले की, कोरोनामुळे सर्व शाळा ऑनलाइन झाल्या. परंतु झोपडपट्टीत वीज नसल्याने त्यांच्या शिक्षणांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित राहिले. तसेच काहींनी टाटा पॉवरकडे देखील अर्ज केला. परंतु त्या जागेवरची मालकी सांगणारे अधिकृत कागदपत्रे नसल्याचे सांगून कनेक्शन दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT