Pakistani ISI Agent Honeytrap
Pakistani ISI Agent Honeytrap Sakal
देश

हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या पाकिस्तानी एजंटचे Video समोर; जवानांना म्हणायची मी तुझ्यासोबत...

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या आयएसआय एजंटला (ISI Agent) लष्कराची गुप्त माहिती दिल्याप्रकरणी लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. लष्कराच्या जवानाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

इंटेलिजन्सच्या तपासात आणि चौकशीत हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या पाकिस्तानी एजंटचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ती बॉलीवूड गाण्यांवर रील बनवून लष्कराच्या जवानांना आपल्या जाळ्यात ओढत असे, असं तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेला प्रदीप कुमार (24) मूळचा रूरकी, उत्तराखंडचा आहे. तीन वर्षे प्रदीप जोधपूरमध्ये तैनात होते. नोव्हेंबर 2021 मध्ये, एका पाकिस्तानी महिला एजंटने प्रथम प्रदीप या लष्करी जवानाला कॉल आला. तेव्हापासून तो तिच्या जाळ्यात अडकला.

प्रदीपसह अनेक लष्करी जवान पाकिस्तानी महिला एजंटच्या निशाण्यावर होते. सुंदर दिसणारी ही महिला एजंट सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रिल्स बनवत असत. बॉलीवूडच्या गाण्यांपासून ते अनेक चित्रपटांच्या संवादांपर्यंत ती रिल्स बनवायची. यानंतर ती आर्मीच्या जवानांना पाठवायची जेणेकरून ते सहज तिच्यावर विश्वास ठेवू शकतील आणि जवान जाळ्यात अडकेल.

पाकिस्तानी एजंटची एक नाही अनेक नावे-

तरुण प्रदीप कुमारला आपल्या स्टाईलच्या जाळ्यात अडकवणाऱ्या हसीनाची अनेक नावे आहेत. ही पाकिस्तानी महिला एजंट प्रिया शर्मा, ​​पायल शर्मा, ​​हरलीन कौर, ​​पूजा राजपूत ही लष्कराच्या जवानांना वेगवेगळ्या नावाने फसवायची, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.

छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून ती प्रत्येक सुख-दु:खात तिच्यासोबत असल्याचं सांगायची. अशा व्हिडिओंच्या माध्यमातून प्रदीपही अडकला. पाकिस्तानी एजंट सांगेल तसे तो करायचा. तिच्या सौंदर्याने तो इतका वेडा झाला की त्याला लग्नाची स्वप्ने पडू लागली.

जासूस व्हिडिओ कॉलवर बोलायची, भेटण्याचे आश्वासन द्यायची-

हा जवान महिला एजंटमध्ये इतका अडकला की तो जवान ती सांगेल तसं करत असे. या पाकिस्तानी महिला एजंटने प्रदीप कुमारशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलत असत. त्याचवेळी त्यांनी दिल्लीतही भेटण्याचे आश्वासन दिले होते. दोघांनी व्हॉट्सअॅपवर चॅट, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल्स करायला सुरुवात केली. हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पाकिस्तानी महिला एजंट व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्ये करत असे. पाकिस्तानी महिला एजंटने तिला भेटण्यासाठी दिल्लीला येऊन त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT