supriya sule sakal media
देश

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) काही प्रमातात घट केली असली तर अद्यापही इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दर अजूनही वाढतच आहेत. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. तसेच खाद्य तेल देखील महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सरकारने तळागाळातील जनतेचा विचार करायला पाहिजे. त्यांच्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरवरील कर कमी करावा. त्यामुळे गोरगरीबांना फायदा होईल, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली.

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला होता. त्यानंतर कर्नाटक, गोवा, छत्तीसगड यांसह अनेक राज्यांनी इंधनावरील कर कमी केला होता. त्यामुळे त्या राज्यात पेट्रोलच्या किमती आणखी कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्यापही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यात आला नाही. तसेच हा कर कमी करण्याचा सध्या विचार नाही, असं खुद्द सरकारमधील मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अद्यापही इंधन दरवाढीचा सामना करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

Solapur Water Crisis: उजनी धरणात उणे २४.३७% पाणीसाठा, साेलापूर जिल्ह्यातील ४४ तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT