देश

पर्रीकरांच्या दोन मिनिटांच्या भाषणानेच भरला जोश

वृत्तसंस्था

पणजी : येथील "अटल मतदान केंद्र कार्यकर्ता' संमेलनात आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दोनच मिनिटे मोठ्या कष्टाने बोलले आणि त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांत जोश आणला. यापूर्वी गेल्या वर्षी 15 मे रोजी कार्यकर्ता संमेलन झाले होते, त्या वेळी पर्रीकर अमेरिकेत होते. त्या वेळी त्यांच्या संदेशाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली होती. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमच्या मैदानावर झाले. या संमेलनाला वीस मिनिटांसाठी पर्रीकर उपस्थित होते. दोन मिनिटे ते बोलले. आपण मोठे भाषण निवडणुकीसाठी राखून ठेवतो असे त्यांनी सांगितले. ते सभास्थळी आले तेव्हा सर्वांनी उठून त्यांचे स्वागत केले. त्यांचे भाषण संपले त्या वेळी टाळ्या थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. शहा यांनीही आपल्या भाषणात पर्रीकर यांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम शब्दबद्ध केले.

ते म्हणाले, की येताना मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यांना मी कष्ट घेऊन येऊ नका असे सांगितले. पण त्यांनी माझा कार्यकर्ता आज येणार आहे, त्याच्याशी संवाद साधण्यासाठी दोन मिनिटांसाठी का होईना मी येतो असे सांगितले. त्यांनी तो हट्ट पूर्ण केला. असे नेते-कार्यकर्ते जोवर आहेत, तोवर भाजपला कोणी पराभूत करू शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT