naidu
naidu 
देश

देश बदलात भागीदार व्हा... : व्यंकय्या नायडू

अवित बगळे

पणजी : देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही अनेक प्रश्न आज कायम आहेत. मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी हा प्रश्नांना उत्तरे शोधली गेली पाहिजेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे यासाठी अभियंत्यांनी देश बदलाच्या या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) चौथ्या पदवीदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पणजीतील कला अकादमी संकुलातील मा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात हा सोहळा झाला. त्यावेळी गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा व संस्थेचे संचालक गोपाळ मुगेराय उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, शिक्षण केवळ अर्थाजन शिकवत नाही. सभोवताली बघण्याची दृष्टीही देते. या दृष्टीतून आपण समाजाचे कोणते दुःख हलके करू शकतो याचा विचार ज्याने  त्याने केला पाहिजे. त्यातूनच समाजाचे भले आणि अंतिमतः देशाची प्रगती होणार आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वापरातून अनेक प्रश्न जगभरात सोडवण्यात आले. भारत म्हणजे ज्ञानाचा आगर मानले जाते. या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला गेला पाहिजे. सर्वेजना सुखिनो भवंतू हा शिक्षणाचा हेतू असला पाहिजे.

राज्यपालांनी देशाचा, समाजाचा विचार युवकांनी आज केला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, चार दिवसांपूर्वी एका तरुणाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तो एका महत्वाच्या पदावर काम करत आहे. त्याला विचारले हे पद तर महत्वाचे आहे पण समाजासाठी काही करण्याची संधी आहे तर कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल.  त्याने उत्तर दिले की याचा विचारच केला नाही. आजची पिढी ही अशी आहे. हे चित्र पालटले पाहिजे. आपल्यासोबतच समाजाचा विचारही प्रत्येकाने केला पाहिजे.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते संस्थेचे संचालक गोपाळ मुगेराय यांनी ती पदवी स्वीकारली. पर्रीकर सध्या दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत असल्याने ते यावेळी उपस्थित नव्हते. या पदवीदान सोहळ्यात पाच  डॉक्टरेट,  46 जणांना पदवी तर 86 जणांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT