देश

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सकाळन्यूजनेटवर्क

मागील काही दिवसांत रेल्वेच्या बोगीला आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकदा या आगीचं कारणही अस्पष्ट राहिलेय. त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे मंत्रालयानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.  रात्री ११ ते सकाळी पाच या कालावधीमध्ये रेल्वेमधील चार्जिंग पोर्ट वापरण्यावर बंदी घातली आहे. ही माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्यानं मंगळवारी ही माहिती दिली.  

पश्चिम रेल्वेनं १६ मार्चपासून रात्री ११ ते पहाटे पाच या कालावधीत चार्जिंग पोर्ट बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.  पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) सुमित ठाकुर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  ‘‘ रात्री ११ ते पहाटे पाच या कालावधीत चार्जिंग पोर्ट बंद ठेवण्याचा नियम देशातील सर्व रेल्वेंना देण्यात आले आहेत. आम्ही १६ मार्चपासून याची अंमलबजावणी केली.’’

दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी गुगनेसन म्हणाले की,  रात्रीच्या कालावधीत चार्जिंग पोर्ट बंद करण्याचे नियम नवीन नाही. याआधीही असा नियम आंमलात आणला होती. २०१४ मध्ये बंगळुरु-नांदेड एक्स्प्रेस रेल्वेत आगीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी रात्रीच्या वेळी चार्जिंग पोर्ट बंद करण्याची शिफारस केली होती. रेल्वेनं अखेर सर्व झोनच्या रेल्वेंना रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत चार्जिंग पोर्ट बंद करण्याचा आदेश दिला आहे. 

 गुगनेसन म्हणाले की, ‘‘ गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत घडलेल्या आगीच्या घटेनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.  याआधीही रेल्वे बोर्डानं असे आदेश दिले होते. रात्री ११ ते पहाटे पाच, या सहा तासांसाठी मुख्य स्विचबोर्डातून चार्जिंग पॉईंटची वीज बंद केली जाईल.’’
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT