Passport sakal
देश

Passport : जपानसह सहा देशांचे पासपोर्ट जगात भारी; ‘हेन्ले पासपोर्ट इंडेक्स’ची यादी जाहीर

जगातील सर्वांत प्रभावशाली पासपोर्टच्या २०२४ मधील यादीत एक-दोन नाही तब्बल सहा देशांनी सर्वोच्च स्थान मिळविले आहे.

पीटीआय

नवी दिल्ली - जगातील सर्वांत प्रभावशाली पासपोर्टच्या २०२४ मधील यादीत एक-दोन नाही तब्बल सहा देशांनी सर्वोच्च स्थान मिळविले आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचे पासपोर्ट सर्वांत प्रभावी ठरले आहे. या यादीत भारताचा क्रमांक ८० वा आहे. एकूण १०४ देशांच्या यादीत पाकिस्तानचे नाव १०१ व्या स्थानी असून अफगाणिस्तान तळात आहे.

‘हेन्ले पासपोर्ट इंडेक्स’ने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयटा) माहितीच्या आधारे ही नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यादीतील पहिल्या सहा देशांच्या पासपोर्टधारक नागरिकांना जगातील १९४ देशांत व्हिसामुक्त प्रवेशास परवानगी आहे. गेल्या पाच वर्षांपासून जपान आणि सिंगापूरने सातत्याने पहिल्या क्रमांकावर वर्चस्व राखले आहे. मात्र यंदा युरोपीय देशांनी पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

इंडेक्समधील स्थान -व्हिसामुक्त देशांची संख्या

१) जपान, फ्रान्स, जर्मनी, इटली, सिंगापूर, स्पेन - १९४

२) फिनलंड, स्वीडन, दक्षिण कोरिया - १९३

३) ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड - १९२

४) बेल्जियम, लक्झेंमबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, ब्रिटन - १९१

५) ग्रीस, माल्टा, स्वित्झर्लंड - १९०

६२) चीन, पापुआ न्यू गिनी - ८५

१००) येमेन - ३५

१०१) पाकिस्तान - ३४

१०२) इराक - ३१

१०३) सीरिया - २९

१०४) अफगाणिस्तान - २८

भारताची स्थिती

क्रमवारीत भारत ८० व्या स्थानी आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारताचा क्रमांक ८३ वा होता. भारतीय नागरिक ६२ देशांत व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात. यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आदी लोकप्रिय देशांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT