Patidar Community Leader Hardik Patel Decided To Join Congress
Patidar Community Leader Hardik Patel Decided To Join Congress 
देश

Loksabha 2019 : हार्दिक पटेलांचा काँग्रेस प्रवेश; आता प्रश्न निवडणूकीचा

सकाळवृत्तसेवा

अहमदाबाद : लोकसभा निवडणूकांच्या तारखा काल घोषित करण्यात आल्यात आणि पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचीही घोषणा केली. हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरु असताना या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

असे असले तरी पक्षात हार्दिक यांची जागा काय असेल? या पक्ष प्रवेशानंतर हार्दिक निवडणूक लढवतील का? असे प्रश्न उभे राहीले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर हार्दिक यांनी ट्विटरद्वारे काँग्रेस प्रवेशाची घोषणा करताच गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या रंगली आहे. 

गुजरातमधील जामनगर लोकसभेच्या जागेवर सध्या भाजपच्या पुनमबेन मादम या खासदार आहेत. हार्दिक पटेल आता या जागेवरून लढण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघात भाजपला 'काटे की टक्कर' मिळण्याची शक्यता आहे. 

 



दरम्यान, 12 मार्च ला अहमदाबाद येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक होईल. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे हार्दिक पटेल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT