Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

Narayana Murthy on Artificial Intelligence: आजची तरुणाई आपल्या पिढीपेक्षा खूप हुशार आहे, असा त्यांचा विश्वास आहे. मूर्ती यांनी सांगितले की AIमुळे काही नोकऱ्या जाऊ शकतात. AI चा वापर सहायक तंत्रज्ञान म्हणून करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
Narayana Murthy reacts to being asked how AI will hurt job prospects
Narayana Murthy reacts to being asked how AI will hurt job prospects Sakal

Narayana Murthy on Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जातील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे मत इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले. त्यांचा विश्वास आहे की एआयमध्ये नवीन संधी निर्माण करण्याची आणि मानवी उत्पादकता वाढवण्याची क्षमता आहे. इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन (ISF) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मनीकंट्रोलशी बोलताना मूर्ती यांनी 1970 च्या दशकाशी तुलना केली.

जेव्हा संगणक-सॉफ्टवेअर साधने बाजारात आली होती तेव्हा संगणकामुळे लोकांच्या नोकऱ्या संपतील, असे त्यावेळी अनेकांनी सांगितले. मात्र, घडले उलटेच. नारायण मूर्ती हे AI एक साधन म्हणून पाहतात. AIचे स्वागत केले पाहिजे असे त्यांचे मत आहे.

Narayana Murthy reacts to being asked how AI will hurt job prospects
Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

आजची तरुण पिढी हुशार आहे

नारायण मूर्ती यांनी तंत्रज्ञान म्हणून जेनेरिक AI आणि लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) चे उदाहरण दिले. ते म्हणाले की, आपल्या तरुणांनी नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी. पण ही एक क्रमिक प्रक्रिया आहे. त्यासाठी वेळ लागतो.

आजची तरुणाई आपल्या पिढीपेक्षा खूप हुशार आहे, असा त्यांचा विश्वास आहे. मूर्ती यांनी सांगितले की AIमुळे काही नोकऱ्या जाऊ शकतात. AI चा वापर सहायक तंत्रज्ञान म्हणून करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.

Narayana Murthy reacts to being asked how AI will hurt job prospects
Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

नारायण मूर्ती म्हणाले की, एआयला सहाय्यक तंत्रज्ञान म्हणून वापरण्याची गरज आहे. नोकऱ्या गमावण्याच्या चिंतेपेक्षा उत्पादकता वाढवण्यासाठी एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान कसे वापरावे याबद्दलच्या चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यांचे मत आहे.

ते म्हणाले की, मला वाटते की नोकऱ्या गमावण्याची चिंता करण्याऐवजी आपण एआय, जनरेटिव्ह एआय, मॉडेल आणि हे सर्व मानवांना अधिक उत्पादक बनविण्यासाठी कसे वापरतो यावर चर्चा, वादविवाद आणि विचार केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com