देश

Loksabha 2019: हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार? लढवणार 'ही' जागा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. काँग्रेसकडून लोकसभेला निवडणुकही ते लढणार असल्याची माहिती मिळत असून गुजरातमधील जामनगर लोकसभेच्या जागेवर ते निवडणुक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुजरातमधील जामनगर लोकसभेच्या जागेवर सध्या भाजपच्या पुनमबेन मादम या खासदार आहेत. हार्दिक पटेल आता या जागेवरून लढण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघात भाजपला कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, 12 मार्च रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या काँग्रेसच्या कार्य कारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे हार्दिक पटेल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कांग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला कडवे आव्हान दिले होते. यामध्ये हार्दिक पटेल यांची भूमिका महत्वाची होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT