Ramdev Baba
Ramdev Baba 
देश

पतंजलीची अमूल, मदर डेअरीला टक्कर; आणणार दूग्धजन्य पदार्थ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : योगगुरु रामदेवबाबा यांनी आता दूग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात उडी घेतली असून, पतंजली दुधासह दही, लस्सी आणि ताक बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल, मदर डेअरी यासारख्या ब्रँडपेक्षा स्वस्तदरात बाजारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

अमूल आणि मदर डेरीने दुधाचे दर प्रतीलिटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच रामदेव बाबा यांच्या पतंजली डेअरीने बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ आणले आहेत. पतंजलीने दूध, दही, लस्सी आणि ताक आणले आहे. रामदेव बाबांनी सोमवारी या नव्या प्रोडक्ट्सचं अनावरण केले. हे सर्व प्रोडक्ट्स इतर कंपन्यांशी तुलना करता स्वस्त आणि गुणवत्तेतही दर्जेदार असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रामधील प्रसिद्ध दूध वितरक कंपन्यांशी तुलना करता पतंजलीचे दर 4 रुपयांनी कमी असणार आहेत. अमूल आणि मदर डेअरीशी तुलना करता दूध चार रुपये स्वस्त असेल असा दावा रामदेव बाबांनी केला आहे.

रामदेवबाबा म्हणाले, की प्रक्रिया केलेल्या दुधाची मागणी पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे. पतंजलीने गाईच्या दुधाचे पनीरही बाजारात आणले आहे. सर्व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा हरियाणा आणि राजस्थानमधून केला जाणार आहे. आगामी काळात पतंजली हर्बल मिल्क आणि फुल क्रीम मिल्क सादर करणार आहे. सध्या दिवसाला चार लाख लिटर दूध पुरवठा करणे आमचे मुख्य लक्ष्य आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत असून त्याचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT