People who commit violence are not nationalists says Vice President Naidu
People who commit violence are not nationalists says Vice President Naidu 
देश

हिंसा करणारे लोक राष्ट्रवादी नाहीत- उपराष्ट्रपती नायडू 

पीटीआय

नवी दिल्ली : कोणाला ठेचून मारण्याच्या घटनांमध्ये आणि वंशद्वेषी घटनांमध्ये सहभागी असणारे लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेऊ शकत नाहीत, असे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आज म्हणाले. अशा घटना रोखण्यासाठी केवळ कायद्याचा मार्ग पुरेसा नसून सामाजिक वर्तणूक बदलणेही तितकेच आवश्‍यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

उपराष्ट्रपती नायडू यांनी आज "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सामाजिक हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. अशा घटनांचे राजकारण केले जात असल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला.

"सामाजिक वागणूक बदलणे गरजेचे आहे. ठेचून मारण्याच्या घटना कोणा राजकीय पक्षामुळे होत नाहीत. तुम्ही यासाठी राजकीय पक्षांना जबाबदार धरले तर मूळ उद्देशच नष्ट होतो. सध्या हेच होत आहे. जमावाकडून मारहाण आणि वंशद्वेषाच्या घटना हा नवा प्रकार नसून पूर्वीही अशा घटना होत होत्या. त्यामुळेच समाजामध्ये बदल आवश्‍यक ठरतो. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मारून टाकत असाल तर स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकता? धर्म, जात, वर्ण आणि लिंग या आधारावर तुम्ही भेदाभेद करत आहात, हे राष्ट्रवादाच्या विरोधी आहे.

"राष्ट्रवाद', "भारत माता की जय' या शब्दांना व्यापक अर्थ आहे,'' असे नायडू म्हणाले. समाजातील सगळेच गैरप्रकार केवळ कायद्याच्या साह्याने बदलता येणार नाहीत, समाजालाही स्वत:ला बदलावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT