Period Taboo esakal
देश

Period Taboo मोडण्याचं प्रशंसनीय पाऊल, लेकीच्या वयात येण्याचं वडिलांनीच केलं जंगी स्वागत!

पाळी हा विषय वडिलांसह सगळ्याच पुरुषांपासून लपवण्याविषयी मुलींना लहानपणापासूनच शिकवलं जातं.

धनश्री भावसार-बगाडे

Father Celebrates Daughter's First Period Viral News In Marathi :

मुलींना जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा त्यांच्या फार भीती अनुभवायला येते. कारण यापूर्वी त्यांना असं ब्लीडींग झालेलं नसतं. हा त्यांच्यासाठी नवा अनुभव असतो. काहींना याविषयी पूर्व कल्पना असते तर काहींसाठी हा धक्काही असतो. शिवाय आपल्या शरीरातला हा बदल म्हणजे काही तरी ओशाळ गोष्ट असल्याचा एक टॅबू समाजात बघायला मिळतो.

पण खरंतर एक स्त्रीच्या आयुष्यातले हे सुंदर वळण असून त्यात काहीही गैर नाही हा विचार हळूवारपणे समाजात रुजत असल्याचं एक चांगलं उदाहरण उत्तर भारतातील जितेंद्र भट्ट यांनी समोर ठेवले आहे.

Period Taboo

जितेंद्र भट्ट यांनी आपली मुलगी वयात आली म्हणून तिच्या पहिल्या पाळीचे सेलिब्रेशन केले. मुलगी वयात आल्यावर सोहळा करण्याची पद्धत भारतात अनेक ठिकाणी आहे. पण हा सोहळा केवळ महिलांपूरताच मर्यादित राहीलेला बघायला मिळतो. मात्र भट्ट यांनी ही चौकट मोडली. वडिलांनीच मुलीच्या वयात येण्याचे स्वागत करत एका समारंभाचे आयोजन केले होते.

याविषयीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यावर लोकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

आपल्याला माहितच आहे की, पूर्वीच्या काळी पाळी विषयी कायम चुप्पी पाळली जात असे. पाळीच्या काळात मुली, महिलांवर अनेक बंधने घातली जात असत, त्यांना वेगळ बसवले जात. पण काळानुसार यात अनेक बदल होत गेले तर त्याविषयीची चुप्पी मात्र आजही पुर्णपणे तुटलेली नाही.

पुरुषांसमोर, त्यांच्याशी याविषयावर चर्चा करताना आजही एक प्रकारचे अवघडलेपण दिसून येते. पण या सगळ्याला मागे टाकणारे उदाहरण उत्तराखंडच्या काशीपूरच्या जितेंद्र भट्ट यांनी उभे केले आहे.

जितेंद्र संगीत शिक्षक आहे. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार जितेंद्र यांनी सांगितले की, ते लहान होते तेव्हा त्यांना या गोष्टीची माहितीच नव्हती. जेव्हा त्यांना या विषयी माहिती झाली तेव्हा त्यांना जाणवलं की, पाळीच्या काळात मुली किंवा महिलांकडे फार हीन भावनेने बघितले जाते. त्या काळात या महिला जर कुठल्या वस्तूला स्पर्श करतील तर त्या वस्तूला अशुद्ध मानलं जात असे.

नव्या पायंडाची सुरुवात

आता ते जेव्हा एका मुलीचे वडिल आहेत तर आपल्या मुलीच्या पहिल्या पाळीत सर्व गैरसमजांना दूर करण्याचे ठरवले. यासाठी हा दिवस साजरा व्हायला हवा असं त्यांना वाटलं. त्यांनी असं केलं कारण त्यांना सगळ्यांना सांगायचं होतं की, हा कोणताही आजार किंवा अशुध्दता किंवा संसर्गजन्य आजार नाही. उलट आनंदाचा दिवस आहे.

लोक याकडे फार सकारात्मकतेने बघत आहेत. त्यांची प्रशंसा करत आहेत. शिवाय पाळी आणि पर्यायाने महिलांकडे बघण्याची हीन दृष्टी यामुळे कमी होण्याची सुरुवात होईल, त्यामुळे महिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मत लोकांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT