petrol diesel
petrol diesel 
देश

सलग 10 दिवस पेट्रोल-डिझेल उच्चांकांवर स्थिर; ग्राहकांच्या खिशाला दिलासा नाहीच

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : एका आठवड्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात भलेही 100 रुपयांची वाढ झालेली असो मात्र, पेट्रोल-डिझेलचे भाव सध्यातरी स्थिर आहेत. थंडीमध्ये वाढ झाल्याने जगभरात कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. विकसित देशांमध्ये बिल्डींगचे तापमान सामान्य ठेवायला सेंट्रलाईज्ड हिटींग सिस्टीम लावलेला असतो, जो कच्च्या तेलाच्या उत्पादनांवर चालतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ होत आहे. 

हेही वाचा - फेसबुक इंडियाचे प्रमुख म्हणतात, बजरंग दलाला FB वर बंदी घालण्याची गरज नाही
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने कमालीची वाढ होत आहे. ब्रेंट क्रूड दहा महिन्यांमध्ये एका उंचीवर असलेला पहायला मिळाला आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुढच्या वर्षी कच्च्या तेलाच्या किंमती 65 डॉलरवर पोहोचू शकतात. तर डोमेस्टीक मार्केटमध्ये आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर तसेच आहेत. त्यात कसलाही बदल झालेला नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग 10 व्या दिवशी कसलाही बदल केला नाहीये.

  • पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ अथवा घट याबाबतचे अपडेट हे दररोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.
  • दिल्लीमध्ये आज 17 डिसेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कसलाही बदल झालेला नाहीये. पेट्रोलचा दर 83.71 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 73.87 रुपये प्रति लीटर आहे. 
  • मुंबईमध्येही पेट्रोलचे दर स्थिर असलेले पहायला मिळत आहेत. मुंबईत  पेट्रोलचा दर 90.34 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेलचा दर 80.51 रुपये  प्रति लीटर आहे. 
  • कोलकातामध्येही परिस्थिती जैसे थे आहे. पेट्रोलचे भाव 85.19 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेलचा दर 77.44 रुपये प्रति लीटर आहे.
  • चेन्नईमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नाहीये. पेट्रोलचे दर 85.51 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेलचे दर 79.21 रुपये प्रति लीटर आहे.
  • बेंगलोरमध्ये पेट्रोल 86.51 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 78.31 रुपये प्रति लीटर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT