देश

Fact Check | न्यूयॉर्क टाइम्समध्ये मोदींचं कौतुक करणारी बातमी पहिल्या पानावर?

विनायक होगाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपला अमेरिका दौरा पूर्ण केला आहे. त्यांच्या या दौऱ्यामधून नेमकं काय साध्य झालं, काय नाही? याबाबतची खोचक चर्चा सध्या मोदी समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु असलेली पहायला मिळत आहे. या दरम्यानच, काल रविवारी एक अशी इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यावर तुफान चर्चा सुरु आहे. 'द न्यू यॉर्क टाइम्स' या अमेरिकन वृत्तपत्राचे पहिले पान असल्याचा दावा करणारी ही इमेज असून ती रविवार, 26 सप्टेंबरची असल्याचा दावा केला जात आहे. या इमेजमध्ये जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत अशा न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकताना दिसत आहेत. त्यांच्या या वृत्तपत्रीय छायाचित्रावर लिहलंय, "Last, Best Hope of Earth" अर्थात, शेवटची अशी पृथ्वीची सर्वोत्तम आशा!

पंतप्रधान मोदींनी आपला अमेरिका दौरा पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी हा फोटो प्रसिद्ध झाला असल्याचा दावा आहे, ज्यामध्ये मोदी एका रजिस्टरमध्ये काहीतरी लिहताना दिसून येत आहेत. पंतप्रधानांनी आपल्या या दौऱ्यामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्रामध्ये सहभाग नोंदवत भाषण केलं आहे. तसेच क्वाड समिटमधील अनेक देशांसोबत द्वीपक्षीय बैठका देखील केल्या आहेत.

मात्र, गंमत अशी आहे की, त्यांच्या या दौऱ्याविषयी न्यू यॉर्क टाइम्ससारख्या मोठ्या प्रतिष्ठीत जागतिक वृत्तपत्रात दखल घेतली गेल्याचे सांगणारी ही कथित इमेज बनावट असल्याचं आढळून आलं आहे. याचं कारण असं की, न्यूयॉर्क टाइम्सने मोदींच्या या दौऱ्याची कसलीही दखल घेतलेली नसताना पहिल्याच पानावर इतकी मोठी प्रतिमा न्यूयॉर्क टाइम्सने छापल्याचा दावा करणारी इमेज ही बनावट असल्याचा दावा मोदी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

मात्र, ज्यांनी ही इमेज शेअर केली आहे, त्यांचा असा विश्वास आहे की ही इमेज अगदी खरी आहे. एका युझरने ही इमेज शेअर करताना म्हटलंय की, श्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिकन लोकांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलीय. ही इमेज प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मात्र, ही इमेज खरोखरच खरी आहे की मोदी विरोधक सांगतायत त्याप्रमाणे ती बनावट आहे, याचा शोध घेतला असता ती इमेज बनावट असल्याचंच निष्पन्न झालं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या 26 सप्टेंबर 2021 च्या अंकांत याप्रकारची कोणतीही बातमी छापून आली नसल्याचंच निष्पन्न झालं आहे.

26 सप्टेंबरच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानाचा फोटो

इतकंच नव्हे तर, या बनावट इमेजमध्ये न्यूयॉर्क टाइम्सच्या खाली असणाऱ्या तारखेमध्ये मोठा घोळ दिसून येतो आहे. ज्याने ही बनावट इमेज बनवली आहे, त्याने "SEPTEMBER" चे स्पेलिंग चुकवून ते "SETPEMBER" असं लिहलं आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलंय की, महामहिम मोदीजी आपल्या देशाला आशीर्वाद देण्यासाठी कोऱ्या A4 कागदावर स्वाक्षरी करत आहेत... हर हर महादेव!

या व्हायरल इमेजमध्ये वापरण्यात आलेला फॉन्ट हा न्यूयॉर्क टाइम्सच्या नेहमीच्या फॉन्टशी जुळत नसल्याचंच स्पष्ट होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT