Plane Schedule eSakal
देश

Plane Schedule : देशातील विमान प्रवास धुक्यामुळे मंदावला! १७७ उड्डाणे स्थगित; रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही झाले विस्कळीत

दिल्लीत सुमारे २० रेल्वेगाड्या उशीराने दाखल होत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. उत्तर भारतातील अन्य शहरात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत हवामानात सुधारणा झाल्याने विमान सेवा सुरळीत राहिली.

सकाळ वृत्तसेवा

देशातील सतरा राज्यांची बुधवारची सकाळ दाट धुक्याने झाली. राजधानी दिल्लीत किमान तापमान ४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. परिणामी रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा आज तिसऱ्या दिवशीही विस्कळीतच राहिली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७० उड्डाणांना फटका बसल्याने अनेक प्रवाशांचा विमान प्रवास आजही रेंगाळला.

यात देशार्तंगत आणि परकी विमान सेवेचा समावेश आहे. दिल्लीत सुमारे २० रेल्वेगाड्या उशीराने दाखल होत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. उत्तर भारतातील अन्य शहरात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत हवामानात सुधारणा झाल्याने विमान सेवा सुरळीत राहिली.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये १८ जानेवारीपर्यंत धुके आणि थंडीची लाट राहू शकते. त्यामुळे रेड ॲलर्ट जारी करण्यात आला. बिहारच्या पाटण्यात काश्‍मीरपेक्षा अधिक थंडी आहे. या ठिकाणी कमाल तापमान १३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. तर जम्मूत कमाल तापमान १६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

देशभरातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरल्याने विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळित राहिली आहे. गेल्या दोन दिवसांतील हवामान पाहता इंडिगोचे २२ टक्के विमाने मेट्रो शहरात ठरल्या वेळेत उड्डाणे करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर एअर एशियाचे ३० टक्के विमाने वेळेत जात असल्याचे सांगण्यात आले. इंडिगोकडून दररोज १७६० उड्डाणे होतात त्यापैकी केवळ २२ टक्के म्हणजेच ३८७ विमानांनी ठरल्या वेळेत उड्डाण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT