pm kisan yojana
PM Kisan Yojana latest update : पंतप्रधान किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. देशभरातील शेकडो शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता आपल्या बँक खात्यात कधी जमा होतो, याची अनेक शेतकरी आतूरतेने वाट बघत आहेत.
प्राप्त माहितीनुसार ज्या राज्यांना अद्याप पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता मिळालेला नाही, त्या राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच हा हप्ता मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपू शकते.
छठ पूजेनंतर दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. मात्र पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिले मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे, या काळातच हप्ता जारी होण्याची दाट शक्यता आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता आधीच हस्तांतरित करण्यात आला आहे. या राज्यांमधील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे, त्यांना किसान योजनेचे हप्ते लवकर देण्यात आले आहेत.