pm modi ayodhya road show iqbal ansari son of babri case litigant hashim ansari showered flowers Video  
देश

Ayodhya Ram Mandir : बाबरी खटल्यातील पक्षकाराने PM मोदींवर उधळली फुलं; पाहा व्हिडीओ

अयोध्या येथे रोड शो दरम्यान जमलेल्या नागरिकांकडून पीएम मोदी यांच्यावर फुले उधळून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी अयोध्या येथे विमातळावर दाखल झाले आणि त्यानंतर पीएम मोदी यांचा एक रोड शो येथे पार पडला. या रोड शो दरम्यान जमलेल्या नागरिकांकडून पीएम मोदी यांच्यावर फुले उधळून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यादरम्यान बाबरी प्रकरणातील पक्षकार हाशिम अंसारी यांचा मुलगा इक्बाल अंसारी हे देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर गुलाबाची फुले उधळताना दिसून आले.

इक्बाल अंसारी यांनी सांगितलं की, अयोध्या सर्वांना संदेश देते की येथे हिंदू आणि मुस्लीम सर्वजण एकत्र मिळून राहातात आणि एकमेकांच्या कार्यक्रमात देखील सहभागी होतात. दरम्यान इक्बाल अंसारी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज तकने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

विशेष बाब म्हणजे बाबरी केसमध्ये इकबाल अंसारी हे पक्षकार राहिले आहेत आणि त्यांनी मंदिरासाठी ही जमीन देण्यास विरोध केला होता. यासाठी त्यांनी कोर्टात देखील धाव घेतली होती. मात्र जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मध्ये वाहनांचा ताफा पुढे जात होता तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर फुले उधळल्याचे पाहायला मिळाले. कोर्टात चाललेल्या प्रकरणादरम्यान इक्बाल अंसारी हे खूप चर्चेत आले होते.

जेव्हा २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी गेले होते तेव्हा बाबरी मशिदीचे पक्षकार असणारे इक्बाल अंसारी यांनी पीएम मोदी यांचं स्वागत केलं होतं. तेव्हा इक्बाल अंसारी यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणाचे निमंत्रण दिलं होतं. तेव्हा निमंत्रण मिळाल्यानंतर इक्बाल अंसारी यांनी सांगितलं होतं की मी कार्यक्रमात नक्की सहभागी होईल. त्यांनी सांगितलं की भागवान राम यांच्या इच्छेने आम्हाला निमंत्रण मिळालं आहे. अयोध्येत गंगा जमुनी तहजीब टिकून आहे. मी नेहमीच मठ-मंदिरांमध्ये जात आलो आहे. पत्रिका मिळाली तर नक्की जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT