Pradhanmantri Sangrahalaya Inauguration
Pradhanmantri Sangrahalaya Inauguration e sakal
देश

प्रधानमंत्री संग्रहालयाचं उद्घाटन, PM मोदींनी विकत घेतलं पहिलं तिकीट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे (Pradhanmantri Sangrahalaya) उद्घाटन केले. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) या संग्रहालयाचे पहिले तिकीट खरेदी केले. या संग्रहालयात देशातील सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांनाही या संग्रहालयात विशेष स्थान देण्यात येणार आहे. (Pradhanmantri Sangrahalaya Inauguration)

भारतीयांसाठी"प्रधानमंत्री संग्रहालय" तिकिटाची किंमत ऑनलाइन खरेदी केल्यास 100 रुपये आणि ऑफलाइन मोडमध्ये 110 रुपये आहे, तर विदेशी नागरिकांसाठी 750 रुपये आहे. 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकिटे खरेदी केल्यास त्यांना 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांनी केलेल्या बुकिंगवर 25 टक्के सूट मिळणार आहे. तरुण पिढीला सर्व भारतीय पंतप्रधानांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्याबद्दल माहिती व्हावी. त्यामधून प्रेरणा मिळावी, यासाठी हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे, असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदींनी या संग्रहालयाचे उद्घाटन केले.

तीन मूर्ती भवनातील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला लागून असलेल्या 10,000 चौरस मीटर जागेवर बांधण्यात आलेल्या या संग्रहालयात माजी पंतप्रधानांशी संबंधित प्रदर्शने असतील. 271 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाला 2018 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. संग्रहालयात एकूण 43 दालनं आहेत. तसेच संग्रहालयाचा लोगो राष्ट्र आणि लोकशाहीचे प्रतीक असलेले धर्मचक्र धारण केलेल्या भारतातील लोकांच्या हातांचे प्रतिनिधित्व करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT