Narendra Modi Sakal
देश

रेकॉर्डब्रेक लसीकरणाने एका पक्षाला ताप; PM मोदींचा काँग्रेसला टोला

सकाळ डिजिटल टीम

वाढदिवस येतील जातील पण १७ सप्टेंबर हा दिवस माझ्यासाठी स्पेशल आणि भावनिक करणारा होता असेही मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गोव्यातील कोरोना योद्ध्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गोव्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शुक्रवारी रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाल्यानं एका पक्षाला ताप आला आहे. आता या राजकीय तापावर काही उपचार आहे का? पक्षाचे नेते लसीकरण विक्रमी झाल्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. शुक्रवारी अडीच कोटी लसीचे डोस देण्यात आले. वाढदिवस येतील जातील पण १७ सप्टेंबर हा दिवस माझ्यासाठी स्पेशल आणि भावनिक करणारा होता असेही मोदी म्हणाले.

मी ऐकलं आहे की जेव्हा लसीकरण असतं तेव्हा जे लस घेतात त्यात १०० पैकी एखाद्याला रिअॅक्शन होते, ताप येतो. आणि असंही म्हटलं जातं की, खूप जास्त ताप आला तर मानसिक संतुलन बिघडतं. पण मी पहिल्यांदाच पाहतोय की अडीच कोटींहून अधिक लसीकरण झालं आणि काल रात्री १२ वाजल्यानंतर अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली. त्यांना ताप आला यामागे काही लॉजिक असू शकतं का असा प्रश्न उपस्थित डॉक्टरांना विचारत मोदींनी काँग्रेसला नाव न घेता खोचक टोला लगावला.

पंतप्रधान मोदींनी गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले. गोवा विकासकामांच्या बाबतीत आघाडीवर आहे. गोव्यातील प्रत्येक घरात आज वीज आणि पाणी पोहोचत आहे. तसंच ग्रामीण भागातही पाणी पोहोचत आहे. पर्यटन क्षेत्रात गोव्याची भूमिका महत्त्वाची आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं इथं पर्यटकांची संख्या वाढणार आहे. संसर्ग कमी झाला असला तरी धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: बीडमध्ये खळबळ! ४५ लाखांच्या लाचप्रकरणानंतर एसीबीची मोठी कारवाई; वन अधिकाऱ्याच्या घरावर छापे

Kalyan: कल्याण डोंबिवलीत ६६१ धोकादायक इमारती, शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात; तातडीने कारवाईचे आदेश

Petrol Diesel Price India : देशात नव्याने पेट्रोल-डिझेल दर जाहीर; कुठे स्वस्त, महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Latest Marathi News Live Update : सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनवर आज मेगाब्लॉक

Koyna Dam: कोयनेच्या पाण्याचा मुंबईकडे प्रवास? सर्व्हेने पुन्हा रंगली चर्चा; हजारो कोटींचा खर्च, कोकणात चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT