PM Modi Lakshadweep Visit: 
देश

Modi Lakshadweep Visit: मोदींनी लक्षद्वीपच्या बीचवर जाऊन फोटोशूट का केलं? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या बीचवर फोटोशूट केल्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या बीचवर फोटोशूट केल्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. काँग्रेसनं मोदींच्या या फोटोशूटवरुन टीका केली आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या या फोटोशूटमागचं कारण सांगितलं आहे. ट्विट करुन शहा यांनी सविस्तर माहिती दिली. (PM Modi Lakshadweep Visit and made photoshoot Amit Shah gives explanation)

मोदींनी नेमकं काय केलंय फोटोशूट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी एक दिवस निवांत बीचवर घालवला. यामध्ये त्यांनी वॉटर स्पोर्ट्स तसेच स्नॉर्कलिंगचा आनंदही लुटला. लक्षद्वीप या बेटावरील सौंदर्याचं यावेळी मोदींनी कौतुक केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेसनं काय केलीए टीका?

काँग्रेसनं ट्वीट करुन मोदींवर निशाणा साधला आहे. ८ महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. अजूनही लोकांच्या हत्या होत आहेत. भारताचे नागरिक मारले जात आहेत, बेघर आहेत. बहिष्कार झेलत आहेत. पण भारताचे पंतप्रधान कुठे आहेत? आपण स्वतःचं पाहा, असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

भारताचे पंतप्रधान मजा करत आहेत, समुद्र किनारी चांगली फोटोग्राफी सुरु आहे. वेगवेगळ्या पेहरावात फोटो घेतले जात आहेत. शानदार पोज दिल्या जात आहेत. कधी किनाऱ्यावर निवांत बसलेले तर कधी समुद्राच्या लाटांशी खेळताना मौजच मौज सुरु आहे. जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याच्या कलेत PM मोदी माहिर आहेत.

शहांनी सांगितलं मोदींच्या फोटोशूटमागचं कारण?

शहांनी ट्विट केलं की, "मनमोहक समुद्रकिनारे, निळ्या पाण्याचे सरोवर आणि बरंच काही लक्षद्वीपमध्ये आहे. ज्यामध्ये जागतिक पर्यटन स्थळ बनण्याची अफाट क्षमता आहे. यासाठी पंतप्रधानांचे आभार की त्यांनी लक्षद्वीपला प्रोत्साहन देण्यासाठी फोटोशूट केलं. यामुळं पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल आणि त्यामुळं तिथल्या लोकांचं जीवनमान उंचावेल"

अमित शहांच्या या ट्विटवरुन हे स्पष्ट होतं की, PM मोदींनी लक्षद्विपच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इथल्या बीचेसवर फोटोशूट केलं आणि ते फोटो सोशल मीडियातून शेअरही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहिण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT